लोटस बंदरावर कोळी बांधवांची समस्या दूर होणार

लोटस बंदरावर कोळी बांधवांची समस्या दूर होणार

घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) : वरळीतील लोटस बंदरावर जेट्टीला तडा गेला आहे. तसेच ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. कोळी बांधवांना होणाऱ्या या त्रासाबाबत वरळीतील युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली आहे. या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

लोटस बंदरावरील बोटींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोळी बांधवांनी आपल्या समस्या युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांच्या समोर मांडल्या होत्या. पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार पाटील यांनी दखल घेत मत्स्य विभाग मुंबईचे सहायक आयुक्त संजय पाटील यांची भेट घेऊन कोळी बांधवांच्या समस्यांचे निवेदन सादर केले. प्रशासकीय मंजुरी घेऊन सदर कामाला सुरुवात करण्यात येईल, असे संजय पाटील यांनी आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com