घरेलु महिला कामगारांसाठी ‘ई-श्रम नोंदणी अभियान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरेलु महिला कामगारांसाठी
‘ई-श्रम नोंदणी अभियान’
घरेलु महिला कामगारांसाठी ‘ई-श्रम नोंदणी अभियान’

घरेलु महिला कामगारांसाठी ‘ई-श्रम नोंदणी अभियान’

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले. त्यानुसार साफल्य फाउंडेशन आणि महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेने घरेलु महिला कामगारांचे नोंदणी अभियान राबविले.
महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य स्तरावर कार्यरत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात वस्ती, भाग स्तरावर बांधकाम कामगार आणि घरेलु महिला कामगार सभासदांची ई-श्रमनोंदणी अभियान राबविले. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ संघटनेच्या सभासदांना मिळावा, यासाठी ई-श्रम नोंदणी करण्याचे आहे, असे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शरद पंडित यांनी सांगितले. नोंदणी केलेल्या कामगारांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कामगारांना नवी ओळख मिळणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष मीना पंडित, प्रदेश चिटणीस सुवर्णा कोंढाळकर, जिल्हा अध्यक्ष उषा जाधव, सुनीता बढे, संध्या आदावडे, वर्षा ताडे, स्वाती डिसूझा, सुजाता गुंजाळ, वनिता इवरे, आदी कार्यकर्त्यांनी घरेलु महिला कामगारांच्या नोंदणी अभियानासाठी सहकार्य केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top