
शेत बांधावर तयार करा प्रयोगशाळा
पुणे, ता. २३ : सूक्ष्मजीव व जैविक अर्क निर्मितीचे तंत्रज्ञान शिकून शेत बांधावरच प्रयोगशाळा उभारल्यास खतांवर होणारा खर्च शून्यावर येतो. याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा पुणे येथे ५ व ६ एप्रिल रोजी आयोजिली आहे. यामध्ये शेत बांधावर कमी खर्चात प्रयोगशाळा कशी उभारावी, सूक्ष्मजीव व जैविक अर्क बनवण्याची प्रात्यक्षिके, प्रत्येक घटकाबद्दल शास्त्रीय माहिती व त्यांचा शेत पिकात, जमिनीची व पाण्याची प्रत सुधारण्यात कसा उपयोग होतो याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. प्रात्यक्षिकामध्ये ट्रायकोडमी या मित्र बुरशीची निर्मिती व या बुरशीपासून नैसर्गिक अर्क तयार करणे, शेती पिकात वापरण्यात येणाऱ्या घटकांपासून नैसर्गिक खत, बुरशीनाशक किंवा रोग व कीड प्रतिनाशके, थर्मल डिकम्पोस्टिंग खत तयार करणे आदींचा समवेश असेल. यासह शेत बांधावर यशस्वीपणे प्रयोगशाळा सुरू केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद होणार आहे. शेतकरी, शेतकरी-गट, सेंद्रिय उत्पादक, विद्यार्थी आणि उद्योजक यांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये.
संपर्क : ७४४७४४३१९८. ठिकाण: सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..