आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रासाठी आणखी ‘पाऊल पडते पुढे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रासाठी आणखी
‘पाऊल पडते पुढे’
आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रासाठी आणखी ‘पाऊल पडते पुढे’

आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्रासाठी आणखी ‘पाऊल पडते पुढे’

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः केंद्र सरकारची महत्त्वकांशी संकल्पना असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्‍वदेशी बनावटीच्या वाहनांचा समावेश लष्करी ताफ्यात मंगळवारी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. येथील बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (बीईजी) आणि केंद्र येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान या सर्व वाहनांना सुपूर्द करण्यात आले. तसेच या वाहनांची पाहणी जनरल नरवणे यांनी केली. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याने आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्राकडे आणखीन एक पाऊल पडले आहे.
या प्रसंगी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लि. चे (टीएएसएल) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुकरन सिंह तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. स्वदेशी उपकरणांमध्ये इनफन्ट्री प्रोटेक्टेड मोबिलिटी वेहिकल्स (आयपीएमव्हीएस), क्विक रिॲक्शन फायटिंग व्हेईकल मीडियम (क्यूआरएफव्ही), मोनोकोक हल मल्टी रोल माईन प्रोटेक्टेड आर्मर्ड व्हेईकल आणि अल्ट्रा लॉंग रेंज ऑब्झर्व्हेशनचा समावेश आहे. यातील आयपीएमव्ही आणि अल्ट्रा लॉंग रेंज ऑब्झर्व्हेशनचा पहिला संच टीएएसएलने तर, भारत फोर्जद्वारे मोनोकोक हल मल्टी रोल माईन प्रोटेक्टेड आर्मर्ड व्हेईकल विकसित करण्यात आले आहे. सैन्यदलाकडून या लढाऊ वाहनांची वाळवंटी तसेच उंचावरील भागांमध्ये चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ही वाहने ज्या लष्करी ताफ्यांमध्ये तैनात असतील तेथे या वाहनांच्या देखरेखीसाठी टीएएसएल साहाय्य करणार आहे. टीएएसएल आणि भारत फोर्जद्वारे या स्वदेशी विकसित प्रणालींचा समावेश केल्यास भविष्यात भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सध्या वाहनांचे १२ युनिट लष्कराला देण्यात आले आहे. भविष्यातील मागणीनुसार वाहनांच्या उत्पादने केली जाणार आहेत. जनरल नरवणे हे लेफ्टनंट जनरल पांडे यांच्यासमवेत दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत.

आयपीएमव्ही यशस्वीपणे पोचती करणे हा ‘टीएएसएल’साठी आणि भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण इथूनच डीआरडीओ आणि एका खासगी कंपनीने सह-विकसित केलेल्या एका धोरणात्मक प्लॅटफॉर्मची पहिली व्यापारी विक्री सुरु झाली आहे. कोरोनामुळे उत्पन्न झालेली आव्हाने आणि त्यामुळे झालेले विलंब या सर्वांवर यशस्वी मात करत टीएएसएलने हा टप्पा पार केला आहे त्यामुळे यश आमच्यासाठी अजून जास्त मोलाचे व लक्षणीय ठरले आहे.
- सुकरन सिंह, संचालक, टीएएसएल

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top