‘लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स’च्या अध्यक्षपदी डँग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स’च्या अध्यक्षपदी डँग
‘लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स’च्या अध्यक्षपदी डँग

‘लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स’च्या अध्यक्षपदी डँग

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : ‘लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’च्या अध्यक्षपदी अॅड. सुरेखा डँग आणि उपाध्यक्षपदी अॅड. वैशाली शहा यांची निवड झाली आहे. पुण्यातील कामगार व औद्योगिक न्यायालयातील वकील, कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या संघटनेची नुकतीच निवडणूक झाली. त्यामध्ये संघटनेच्या सचिवपदी अॅड. ओंकार देशपांडे आणि खजिनदारपदी अॅड. सुनीता साबणे यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. वरुण जोशी, अॅड. मनोज सूर्यवंशी, अॅड. ऐश्वर्या दीक्षित, अॅड. अजिंक्य मालशे, अॅड. तारका माने आणि लेखापरीक्षक म्हणून अॅड. मिहीर कुलकर्णी यांची निवड झाली. नवनिर्वाचित अध्यक्षा डँग यांनी संपूर्ण कार्यकारिणीसह कामगार व औद्योगिक न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीशांची भेट घेऊन, दैनंदिन कामकाजाबाबत चर्चा केली, तसेच व्यावसायिकांच्या अडचणींबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..