सहा हजार ४३७ लहान मुलांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा हजार ४३७ लहान मुलांचे लसीकरण
सहा हजार ४३७ लहान मुलांचे लसीकरण

सहा हजार ४३७ लहान मुलांचे लसीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : शहरांमधील वेगवेगळ्या शाळांमधून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याला मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पुणे महापालिकेतर्फे देण्यात आली.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात होते. त्यातही पुणे शहरात रुग्णसंख्येचा आकडा सातत्याने वाढत होता. गेल्या महिन्यापासून नव्याने निदान होणाऱ्या कोरोनाबाधीतांचा आकडा सातत्याने कमी होत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची तिसरी लाट नियंत्रित ठेवण्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची भूमिका महत्त्वाची असल्याचा विश्वास सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमिवर १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना कर्बोव्हॅक्स ही लस देण्यात सुरवात केली आहे. या लसीकरणाची गती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
शहरात १५ मार्चपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्याचा पहिला डोस सध्या देण्यात येत आहे. आतापर्यंत सहा हजार ४३७ मुला-मुलींना लस देण्यात आली. शहरात गेल्या सोमवारी (ता. २१) १२ ते १४ वर्षे वयोगटातील ६८७ मुलांनी लस घेतली होती. ही संख्या आता ९७५ पर्यंत वाढली आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

‘‘शहरात गेल्या तीन दिवसांपासून पाच शाळांमधून लहान मुलांचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यातून आठशे विद्यार्थ्यांना लस देण्यात आली होती. या केंद्रांमधून मोठ्या संख्येने मुले लस घेत आहेत.’’
डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

‘‘लसीमुळे कोरोना होत नाही आणि झाला तरी त्याची तीव्रता वाढत नाही, हे तिसऱ्या लाटेत दिसून आले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटा भीषण होत्या. त्या तुलनेत तिसरी लाट सौम्य वाटली. त्यामुळे मुलांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लस घेण्यास प्राधान्य दिले आहे.’’
सतीश गारडे, पालक

पालकांनी मुलांना लस घेण्यासाठी एकटे पाठवून नये. लस घेताना घरातील कोणीतरी मुलाबरोबर असले पाहिजे. लस घेणे हे ‘सेलिब्रेशन’ नाही. हा वैद्यकीय प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे तेथे डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा
डॉ. दिलीप घोरपडे यांनी केले.

शहरातील लसीकरण
वयोगट ................ लस घेतलेल्यांची संख्या
१२ ते १४ ............. ६,४३७ (पहिला डोस)
१५ ते १७ ............. ६३,४६५ (दोन्ही डोस)
१८ ते ४५ ..............१८,८९,०९३ (दोन्ही डोस)
४६ ते ६० .............. ५,७९,४८६ (दोन्ही डोस)
६० पेक्षा जास्त ...... ४,४४,४६०

एकूण लसीकरण
पहिला डोस .......... ३,८२,४,३६०
दोन्ही डोस ........... ३,१३,६,३८७
बूस्टर डोस ........... १,३६,५८०

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..