सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बापट यांच्याकडून मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची
बापट यांच्याकडून मागणी
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बापट यांच्याकडून मागणी

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची बापट यांच्याकडून मागणी

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३० : पुणे येथील बिबवेवाडीतील राज्य विमा रुग्णालय येथे कमी उत्पन्न असलेल्या कामगारांच्या आरोग्यासाठी कार्यरत असलेले दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करावे. उर्वरित ३०० खाटांचे आणि हॉस्पिटलशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालय बांधावे, अशी मागणी खासदार बापट यांची लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत मुद्दा मांडला. केंद्रीय कामगार मंत्रालयामार्फत हे रुग्णालय चालविले जाते.
बापट यांनी सांगितले, की हे रुग्णालय १६.५ एकर परिसरात आहे. जिथे पन्नास खाटांच्या ओपीडी विभागाची सुविधा उपलब्ध होती. या रुग्णालयाच्या विस्ताराची नितांत गरज आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) केंद्रीय कार्यालयाकडे वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यासाठी आणि उपलब्ध जागेत ओपीडीसह आयपीडी सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रस्तावाला ‘ईएसआयसी’ने मंजुरी दिली आणि पहिल्या टप्प्यातील २०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

कार्यवाही करावीच लागेल
केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेच्या खासदारांना मिळालेले नियम ३७७ हे संसदीय आयुध आहे. ज्यात खासदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला केंद्र सरकारने विशिष्ट मुदतीत उत्तर देणे बंधनकारक असते. त्यामुळे या नियमांतर्गत पुण्याशी संबंधित हा मुद्दा मांडला गेल्याने त्याची खात्रीशीरपणे दखल केंद्राला घ्यावी लागेल आणि खासदार बापट यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर कार्यवाही करावी लागेल.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..