
तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी शिबिर
पुणे, ता. १ : जागतिक तृतीयपंथी दिवसाचे औचित्य साधून गेल्या ३१ मार्च रोजी तृतीयपंथी नागरिकांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी कसबा पेठ मतदारसंघात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. तृतीयपंथीयांचा मतदार यादीत समावेश करून त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे, हा शिबिराचा मुख्य उद्देश्य आहे.
मतदार नोंदणी अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवार पेठेत आयोजित या शिबिरामध्ये तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के यांनी मार्गदर्शन केले.
नायब तहसीलदार प्रशांत कसबे, महसूल सहायक अजिंक्य वनशिव, अजय भिसे, योगेश चव्हाण, सुनील माने, दिनेश शिंदे, हनुमंत ढाळे, केंद्रस्तरीय अधिकारी अभिजित जाधव यांनी तृतीयपंथी मतदारांना नाव नोंदणीसाठी कागदपत्रांची माहिती माहिती दिली. गोल्डन हार्ट संस्थेच्या समाजसेविका पन्ना दीदी, मल्लिका दीदी, अलका फाउंडेशनतर्फे अलका गुजनाळ, अमित गुजनाळ, नीलेश गुजनाळ, अमित मोहिते, सुरेश कालेकर आदी या वेळी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..