खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या
खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या

खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : महापुरुषांच्या जयंतीनिमित्त छापलेल्या बॅनरवर छायाचित्र न छापल्याच्या रागातून दोघांना हातोड्याने मारहाण करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १९ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील शिवशंभोनगरमध्ये घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली.

नुरूद्दीन निजामउद्दीन मुल्ला (वय २५), रवीकिसन जरपुला (वय ३८, दोघेही रा. गोकुळनगर, कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पंडित वेंटेनवरू (वय २०, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पंडित व त्याचा मित्र गंगाराम काळे हे दोघेजण १९ एप्रिल रोजी रात्री शिवशंभोनगर येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या नुरूद्दीनसह व रवीकिसन यांनी फिर्यादीस यास महापुरुषांच्या जयंतीनिमित्त छापलेल्या बॅनरवर आपले छायाचित्र न छापल्याबद्दल विचारणा केली. त्यानंतर नुरूद्दीन व रविकिसन यांनी पंडित व गंगाराम यांना मारहाण केली. त्याचबरोबर त्यांच्याकडील हातोड्यानेही दोघांना मारल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top