लाचप्रकरणी अभियंत्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचप्रकरणी अभियंत्यांना अटक
लाचप्रकरणी अभियंत्यांना अटक

लाचप्रकरणी अभियंत्यांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : मार्केटयार्डातील कामांचे बिल मंजुरीसाठी बांधकाम व्यावसायिकाकडे दोन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. ८) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता प्रमोद कृष्णराव तुपे आणि उपअभियंता अरविंद दामोदर फडतरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली. याबाबत २६ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वच्छतागृह व उद्योग भवन स्लॅबचे वॉटर प्रुफिंगचे काम केले होते. या दोन कामांचे बिल मंजूर करण्यासाठी बिलाची १५ टक्के रक्कम मागण्यात आली होती. त्यामुळे याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..