
दांपत्याचा घटस्फोट केवळ १५ दिवसांत
पुणे, ता. १० : वैचारिक मतभेदांमुळे दोन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दांपत्याचा केवळ १५ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी घटस्फोट मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. घटस्फोट घेतलेल्या या जोडप्याने ॲड. अमृता देशमुख, ॲड. तनय देशमुख आणि ॲड. ऋतुजा राय यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. दोघेही उच्चशिक्षित आहेत. ती पुण्यात नोकरीस आहे. तर तो मुंबईत नोकरी करायचा. त्यांना अपत्य नाही. त्याचे २०१६ मध्ये लग्न झाले होते. डिसेंबर २०१९ पासून दोघे वेगळे राहत होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..