तिच्या आश्वासक वाटचालीचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिच्या आश्वासक वाटचालीचा सन्मान
तिच्या आश्वासक वाटचालीचा सन्मान

तिच्या आश्वासक वाटचालीचा सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : कुटुंबाला दुय्यम स्थान देऊन रुग्ण सेवा करणाऱ्या, पतीच्या निधनानंतर कुटुंबासाठी रस्त्यावर अंडी विकणाऱ्या, गोरगरिबांना अन्न-पाणी पुरविणाऱ्या आणि आले मरण तर येऊ देत म्हणत घरोघरी कचरा गोळा करायला जाणाऱ्या महिलांची आश्वासक वाटचाल समजावून घेत, त्यांचा सन्मान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनने ‘कोरोना संकटाशी झुंज-तिची आश्वासक वाटचाल’कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ससून रुग्णालयातील अधिपरिचरिक मनीषा पोखरकर, एकल महिलांच्या प्रतिनिधी माया दाते, भटक्या विमुक्त समाजाच्या महिला प्रतिनिधी पुष्पा शेगर, कचरा वेचक महिला गंगाबाई चखाले, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या गीता इंगळे यांचा सन्मानपत्र, पुस्तके देऊन सन्मान केला. यावेळी या महिलांनी कोरोना काळातील अनुभव मांडले. महात्मा फुले प्रतिष्ठानच्या सरचिटणीस ॲड. शारदा वाडेकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. फाउंडेशनच्या सदस्या वैशाली भांडवलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
फाउंडेशनचे विश्वस्त प्रा. सुभाष वारे, ॲड. संतोष म्हस्के, विचारवेधचे आनंद करंदीकर, लेखिका सरिता आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा क्षीरसागर, विधिज्ञ मोहन वाडेकर, फाउंडेशनचे सदस्य हनुमंत बहिरट आदी कार्यक्रमाला उपस्थित होते. विशाल विमल यांनी प्रास्ताविक केले. तमन्ना इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. इब्राहिम खान यांनी सन्मानपत्र वाचन केले. राहुल भोसले यांनी आभार मानले.
कुटुंबातील सर्वांना कोरोनाची लागण झाली होती, त्यात पतीचे निधन झाले. मी आजवर कधीही घराबाहेर पडली नव्हते, पण, या संकटामुळे घराबाहेर पडावे लागले. शेतीच्या, घराच्या कामांची जबाबदारी अंगावर आली. बाजारात जाऊन रस्त्यावर बसून अंडी विकण्याचे देखील काम करावे लागले, असे माया दाते यांनी सांगितले. इतर महिलांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top