अक्कलकोट येथील सी.बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संप्पन्न
AKK25B05703
अक्कलकोट ः खेडगी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित मान्यवर माजी विद्यार्थी व शिक्षक वृंद.
खेडगी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
अक्कलकोट, ता. १५ ः अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. किसन झिपरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्या जयश्री बिराजदार या होत्या.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक प्रा.यशोदा इळगेर उपस्थित होते. प्रारंभी पर्यवेक्षक प्रा. निलप्पा भरमशेट्टी यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. उपप्राचार्या वैदेही वैद्य यांनी प्रस्ताविकातून माजी विद्यार्थी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. या मेळाव्यास वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेल्या माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.श्रीकांत जिद्दीमनी, प्रा.श्रीमंत बुक्कानुरे, प्रा.डॉ.किशोर थोरे, प्रा.शैला गिरी, प्रा.विजया कोन्हाळी, प्रा.सिद्धारूढ भैरूनगी, प्रा.महेश पाटील, प्रा.नागेश विजपुरे, प्रा.शिवशरण कलशेट्टी, प्रा.शिवशरण कलशेट्टी, प्रा.दीपिका भकरे आणि बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी तर प्रा.विजया कोन्हाळी यांनी आभार मानले.

