बार्शीत पाणी पुरवठ्याचा पहिला टप्पा सुरु
बार्शीत पाणीपुरवठ्याचा पहिला टप्पा सुरू
अजय होनखांबे; एप्रिलपर्यंत संपूर्ण योजना कार्यान्वित होणार
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. १५ : बार्शी नगरपालिकेने माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर २०२३ मध्ये २९६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती. त्यातील पहिल्या टप्प्यातील पाणी सोमवारी (ता. १५) बार्शीत दाखल झाले. त्याचे पूजन जलशुद्धीकरण केंद्र येथे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेतील जुन्या जलवाहिनीमुळे शेंद्री ते बार्शीपर्यंत सतत पाणी गळती होत होती, ती आता बंद होणार आहे.
नवीन जलवाहिनी असल्याने आता गळती होणार नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. सध्या २२.५ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील जलवाहिनीमार्फत कुठेही गळती न होता शहराला पाणी मिळणार आहे. ७२ किमीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित २२ किमीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी सांगितले.
रिधोरेपासून जुन्या जलवाहिनीमधून नवीन लाइन जोडली आहे. जुन्या लाइनला कोणत्याही प्रकारचा धोका नसून, त्यामुळेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी जोडल्याचे होनखांबे यांनी सांगितले. परंतु, कुर्डुवाडी ते कंदरपर्यंत २२ किमीच्या नवीन जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे, ते लवकरच पूर्ण होणार आहे. सध्या तरी शेंद्रीपासून बार्शीपर्यंत शहरवासीयांना विनासायास पाणी मिळणार आहे. नवीन जलवाहिनीच्या जॅकवेलचे कामही पूर्णपणे झाले आहे.
---
कोट
नवीन पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे पूर्ण होऊन योजना एप्रिलपर्यंत कार्यान्वित होईल. पूर्वी शेंद्री ते बार्शी दरम्यान जुनी जलवाहिनी असल्याने खूप गळती होत होती. त्यामुळे पाणी वाया जात होते; परंतु आता या नवीन जलवाहिनीमुळे गळती पूर्णपणे बंद होणार आहे. उन्हाळ्यापूर्वी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन योजनेचे पाणी मुबलकपणे शहरवासीयांना मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- अजय होनखांबे, जलदाय अभियंता, बार्शी नगरपरिषद, बार्शी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

