Sun, Jan 29, 2023

बाणेरमध्ये टोळक्यात कोयत्याने हाणामारी
बाणेरमध्ये टोळक्यात कोयत्याने हाणामारी
Published on : 16 January 2023, 6:06 am
बालेवाडी, ता.१६ ः बाणेर येथील गणराज चौकात सोमवारी रात्री १० च्या सुमारास दुचाकींवरून हातात कोयते घेऊन आलेल्या टोळक्यात हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. सिमेंटच्या मोठ्या विटा, बांबू, कोयते, दांडूच्या सहाय्याने या टोळक्याने मारहाण केली. या हाणामारीत दोघे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. जखमी कोणत्या रुग्णालयात दाखल आहे याची माहिती मिळाली नसून, घटनास्थळी तीन दुचाकी आढळून आल्या आहेत. त्यातील एका दुचाकीचे बरेच नुकसान झाले आहे. हे तरुण कोण होते, याबद्दल माहिती मिळाली नसून पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.