लवंग जि.प. शाळेने पटकावली ''रोबो एल 1'' राज्यस्तरीय रोबो सॉकर चॅम्पियनशिप
BON25B01823
कोल्हापूर : राज्यस्तरीय रोबो सॉकर चॅम्पियनशिप विजेता लवंग शाळेचा संघ. समवेत मार्गदर्शक शिक्षक जावीद मुलाणी.
......
लवंग जिल्हा परिषद शाळेची संघ प्रथम
...........
राज्यस्तरीय रोबो सॉकर चॅम्पियनशिप; राज्यभरातील २२ संघांचा सहभाग
........
वेळापूर, ता. १५ : कोल्हापूर रोबोस्टॉर्म टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राज्यस्तरीय रोबो सॉकर चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील लवंग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रोबो एल १ संघाने प्रथम क्रमांक पटकावून चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे.
राजमाता जिजाऊसाहेब सभागृह (कॉनव्होकेशन हॉल) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळेतील २२ संघाने सहभाग नोंदवला होता.
२०२४-२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हास्तरावरून जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका शाळा निवडण्यात आल्या होत्या. त्या शाळांना रोबोटिक्स संदर्भातील इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी), रोबोटिक्स एज्युकेशनल किट्स पुरवण्यात आले होते. त्यासंदर्भात जिल्हानिहाय जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये राज्यस्तरीय रोबोसॉकर चॅम्पियनशिप २०२५ ची घोषणा करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये लवंग जिल्हा परिषद केंद्र शाळेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. लवंग टीममध्ये शिक्षक जावीद मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या टीममध्ये शाळेतील इयत्ता सातवीमधील विद्यार्थी संस्कार नितीन वाघ (कॅप्टन), प्रतीक भारत चव्हाण (पोझिशन डायरेक्टर) आणि श्रेयस भीमराव निंबाळकर (रोबो मेकर) यांनी कार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक अशोक पवार, सहकारी शिक्षक शुभांगी हिरवे, संगीता भोंग, करीम कोरबू यांचे सहकार्य लाभले. माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी, अकलूज बीट शिक्षण विस्ताराधिकारी तथा केंद्रप्रमुख महाळुंग भक्ती नाचणे यांनी संघातील खेळाडूंचा सन्मान केला.
चौकट
लवंगच्या शाळेच्या संघाला
पहिल्या विजेतेपदाचा बहुमान
लवंगच्या ‘रोबो एल १’ संघाने फायनलमध्ये सिंधुदुर्ग संघावर मात केली अन् पहिल्या राज्यस्तरीय रोबोसॉकर स्पर्धेचे पहिले विजेतेपद मिळविण्याचा बहुमान मिळाला.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

