देशाच्या लोकशाहीवर मोदींचे संकट

देशाच्या लोकशाहीवर मोदींचे संकट

चाकण, ता. १० : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी देशाच्या लोकशाहीवर संकट आणत आहेत. त्यांना घटना बदलायची आहे, असे त्यांचे काही लोक सांगत आहेत. घटना बदलण्यासाठीच त्यांना चारशे खासदार निवडून पाहिजेत,’’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केला.
चाकण (ता. खेड) येथे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारानिमित्ताने आयोजित जाहीरसभेत पवार बोलत होते. शिवसेनेते नेते आदित्य ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शशिकांत शिंदे, सचिन आहिर, आमदार संजय जगताप, हिरामण सातकर, अतुल देशमुख, अशोक खांडेभराड, जगन्नाथ शेवाळे, विजय डोळस, मनोहर वाडेकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘तुमच्या, आमच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम भाजप करत आहेत. मी अनेक नेत्यांच्या सभा बघितल्या. प्रत्येक पंतप्रधानांनी आम्ही काय केले हे सांगितले. परंतु हे पंतप्रधान उद्धव ठाकरे व माझ्यावर टीका करतात. आमच्यावर टीका केली तरी आमच्या अंगाला भोक पडत नाहीत. शेती, उद्योगाशी माझा संबंध आहे. कांदा उत्पादक संकटात आहे. कांद्याचे भाव वाढले, त्या वेळी खासदार कांदे गळ्यात घालून आले. शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे. अमोल कोल्हेंला निवडून द्या. मी त्यांची संसदेतील भाषणे ऐकली आहेत.’’

आदित्य ठाकरे म्हणाले...
- कोल्हेंच्या प्रेमाखातर मी आलो आहे. कोल्हे तुम्ही निवडून येणार आहात.
- तुमचे दिल्लीच तिकीट बुक करा. तुम्ही देशाचा आवाज आहे. भाजप तडीपार होणार
- चार जूनला इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीच येणार

बाळासाहेब थोरात म्हणाले...
- डॉ. कोल्हे एक चांगले कलाकार आहेत. कोल्हे विचारांच्या पाठीमागे राहिले.
- मोदी, शहासुद्धा त्यांचे भाषण शांततेत ऐकतात.
त्यांना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचे आहे.
- देशाचे राजकारण बिघडलेय. सामान्य माणसाला साहेबांची काळजी वाटते.

डॉ. अमोल कोल्हे
- सगळे कार्यकर्ते मनापासून काम करत आहेत. गद्दारी गाडली जाईल.
- माझ्या घरात कोणी राजकारणी नाही. कर नाही त्याला डर कशाला.
- कंपनीचा फायदा करून तुम्ही तुमचे उखळ पांढर केले नाही का?
- आढळराव पाटील यांनी वनखात्याची व देवस्थानाची जमीन लाटली, या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी
- कांदा निर्यातबंदी उठवायला उशीर झाला.
- दादा तुम्ही फार मोठे नेते आहात. दम तुम्ही आम्हाला का देता.

चाकण ः महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार. शेजारी इतर मान्यवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com