शिल्पकार राम सुतार श्रद्धांजली सभा

शिल्पकार राम सुतार श्रद्धांजली सभा

Published on

सुतार यांच्या कलाकृती
उर्जा देणाऱ्या :आठवले
नवी दिल्ली, २७: पद्मविभूषण व महाराष्ट्रभूषण डॉ. राम सुतार यांना आज राजधानी दिल्लीत आदरांजली अर्पण करण्यात आली. राम सुतार यांनी घडवलेले पुतळे समाजाला ऊर्जा आणि प्रेरणा देणारे असून त्यांच्या कलाकृती इतिहासाच्या जाणिवा जागृत करणाऱ्या आहेत, अशा शब्दांत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
शिल्पकार राम सुतार यांचे १८ डिसेंबरला नोएडा येथे निधन झाले होते. दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आज श्रद्धांजली सभा झाली. राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कला विश्वाला जागतिक पातळीवर एक गौरवास्पद ओळख मिळवून देणारा एक महान कलावंत हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. श्रद्धांजली सभेत प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी मान्यवरांचे शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले. तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राम सुतार यांच्या शिल्पकलेचा गौरव करताना यांच्या बालपणीच्या शिल्पकलेतील रुचीपासून ते ''स्टॅच्यू ऑफ युनिटी'' आणि मुंबईतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३५० फूट उंच प्रतिमेच्या निर्मितीपर्यंतच्या कारकीर्दीचा उल्लेख केला. त्यांचा वारसा अनिल सुतार यांच्या माध्यमातून पुढे समर्थपणे सांभाळला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी राज्य सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शिल्पकार अनिल सुतार यांनी वडिलांची जीवनशैली आणि अखंड कार्यमग्नतेच्या आठवणी सांगितल्या. सुतार कुटुंबातील समीर आणि सोनाली यांनीही भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक संचालक हेमराज बागुल यांनीही राम सुतार यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com