Pune crime news housebreaking attempt

Pune crime news housebreaking attempt

sakal

Pune Crime : कल्याणीनगर हादरले; थकलेले घरभाडे भरण्यासाठी पुतणीनेच रचला काकाच्या घरी चोरीचा कट!

Pune crime news housebreaking attempt : मित्राचे थकलेले घरभाडे भरण्यासाठी पुतणीनेच रचला काकाच्या घरी चोरीचा कट; येरवडा पोलिसांनी तिघांना केली अटक.
Published on

पुणे : कल्याणीनगर परिसरात भरदिवसा सदनिकेत शिरून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. मित्राचे थकलेले घरभाडे भरण्यासाठी पुतणीनेच काकाच्या घरी चोरीचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

कल्याणीनगर भागात सोमवारी (ता. ५) दुपारी एका सदनिकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारदार महिला आणि त्यांचे पती कल्याणीनगर भागात वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी तक्रारदार महिला सदनिकेत एकट्याच होत्या. त्यावेळी चेहरा झाकलेले दोघे जण सदनिकेत शिरले. महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यानंतर आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी जमा झाले. त्यामुळे आरोपी पसार झाले.

Pune crime news housebreaking attempt
अकलुज पोलीसांनी केली चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीस अटक

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर एक संशयित सोसायटीच्या परिसरात थांबलेला आढळून आला. तपासादरम्यान घटनेच्या वेळी महिलेची पुतणी सदनिकेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तिची चौकशी केली असता तिने दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. चौकशीत पुतणीने मित्राचे घरभाडे थकल्याने काकाच्या घरात चोरीचा कट रचल्याची कबुली दिली.

अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सहाय्यक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, पोलिस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com