

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ ः कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनावेळी इंटरनेट सेवा बंद केल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे. ‘‘दिल्ली पोलिसांनी दहा ऑक्टोबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सार्वजनिक व्यवस्था कायम ठेवण्यासह संभाव्य अशांतता रोखण्याच्या उद्देशाने परिस्थिती लक्षात घेऊन याबद्दल निर्णय घेण्यात आला होता,’’ असे गृह सचिवांनी न्यायालयात सांगितले.
आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने इंटरनेट सेवेवर प्रतिबंध घालण्याचा निर्णय प्रशासकीय अधिकारांशी संबंधित असल्याचा युक्तिवाद गृह सचिवांनी उत्तरात केला आहे.
रायसीना हिलच्या परिघातील चार किलोमीटर क्षेत्रात नऊ ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते दहा ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मोबाईल व्यतिरिक्तच्या इंटरनेट सेवा तसेच वायफाय-ब्रॉडबॅंड मात्र सुरू होत्या, असे गोविंद मोहन यांनी उत्तरात म्हटले आहे. ‘‘कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा निलंबित करण्याशी संबंधित परवानगी मंजूर करावी. यादृष्टीने ११ ऑक्टोबर रोजी देण्यात आलेल्या निकालात सुधारणा करावी,’’ अशी विनंतीही गृह सचिवांनी न्यायालयाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.