धायरीत आता कुऱ्हाड गॅंग; पाच तरुणांना नाहक मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धायरीत आता कुऱ्हाड गॅंग; पाच तरुणांना नाहक मारहाण
धायरीत आता कुऱ्हाड गॅंग; पाच तरुणांना नाहक मारहाण

धायरीत आता कुऱ्हाड गॅंग; पाच तरुणांना नाहक मारहाण

sakal_logo
By

धायरी, ता. ४ ः पाच तरुणांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दहशत निर्माण करणाऱ्या सहा जणांवर सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
भूषण उत्तम मोहिते (वय २०, ओमसाई ऑर्चीड बिल्डींग, महादेवनगर, धायरी) असे फिर्यादीचे नाव आहे. भूषण हा अभिषेक हजारे, अंकुश लोखंडे, समर्थ माने, कुणाल गायकवाड या मित्रांसह गणपती मंदिराजवळ शुक्रवारी रात्री कट्ट्यासमोर गप्पा मारत बसले होता. त्यावेळी साईनाथ आडे, आर्यन पाटणकर व इतर चार जण दुचाकीवरून आले. फिर्यादी व चार मित्रांशी वाद घालून शिवीगाळ केली. साईनाथ आडे व आर्यन पाटणकर याने अभिषेक हजारे व अंकुश लोखंडे यांच्या कानाखाली मारुन सोबतच्या दोन मुलांनी समर्थ माने, कुणाल गायकवाड यांना लाथा मारल्या. त्यानंतर साईनाथ आडे याने कुऱ्हाड दाखवून धमकी दिली. आर्यन पाटणकर व इतर मुलांनी शिवीगाळ करून व पुन्हा फिर्यादीच्या मित्रांना लाथा मारुन ते निघून गेले.