मन की बात ऐका, नाही तर पद सोडा

मन की बात ऐका, नाही तर पद सोडा

धायरी, ता. १३ : ‘‘अमेठीनंतर आता आपल्याला बारामती जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांनी आत्तापासून कामाला लागावे,’’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज धायरीतील ‘महाविजय २०२४’ या पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात केले.
भोर तालुक्यात मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी अवघे १५ जण उपस्थित असल्याबाबत खंत व्यक्त त्यांनी ‘मन की बात ऐका, नाही तर पद सोडा,’ असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
मन की बात ऐकण्यासाठी येणार नाहीत, त्यांना पदावरून हटवणार आहे. भोरमध्ये अवघे १५ जण ‘मन की बात’ ऐकण्यासाठी होते. ‘मन की बात’ ऐकण्यासाठी आलेच पाहिजे. त्याचे फोटो अपलोड झालेच पाहिजेत. भोरच्या पदाधिकाऱ्यांसाठी डिसेंबर महिना शेवटचा अल्टिमेटम असेल, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘कार्यकर्ता हा कुठल्याही संघटनेचा प्राण असतो. भाजप पक्ष तर कार्यकर्त्यांनीच मोठा केलेला आहे. केवळ भाजपमध्येच सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मूर्तिमंत उदाहरण आहेत. मोदींनी संकल्पित केलेला भारत घडवायचा असेल, तर आपला संकल्प सत्यात उतरवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी मोदी यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अविरत मेहनत घ्यावी.’’
या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, राहुल कुल, शहराध्यक्ष धीरज घाटे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

मोठ्या कामासाठी केलेली छोटी तडजोड
पुण्याचे पालकमंत्रिपद गेल्याने नाराज होऊ नका. मोठ्या कामासाठी केलेली ही छोटी तडजोड आहे. माझे शासकीय विश्रामगृहातील कार्यालय सुरू राहणार आहे. काम पण सुरू राहणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकायची ही संधी आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


चंद्रशेखर बावनकुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com