फुरसुंगी नगरपरिषदेमध्ये
२६ उमेदवारांची माघार

फुरसुंगी नगरपरिषदेमध्ये २६ उमेदवारांची माघार

Published on

फुरसुंगी, ता. २२ : फुरसुंगी नगरपरिषदेच्या निवडणुकीतून २६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता नगरसेवकपदासाठी १४७ जण तर नगराध्यक्ष पदासाठी सात जण असे १५४ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
फुरसुंगी नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाच्या ३२ जागांसाठी २१६ अर्ज आले होते. त्यातील १७२ अर्ज वैद्य ठरले. निवडणुकीतून माघार घेण्याच्या मुदतीमध्ये नगरसेवक पदाच्या २५ उमेदवारांनी माघार घेतली. नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी १६ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामधील आठ अर्ज वैद्य ठरले होते. निवडणुकीच्या माघार घेण्याच्या मुदतीमध्ये एका उमेदवाराने माघार घेतली आहे.
येथील निवडणुकीत काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. गावठाण हद्दीमध्ये भावकी आणि नातेवाइकांवर मतदान अवलंबून आहे. असे असले तरी सर्वच उमेदवारांची भावकी आणि नातेसंबंध सारखेच असल्याने कोण कोणाच्या पारड्यात मतदान करणार, यामध्ये रंगत येणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com