तीन कोटींची फसवणूक
जादा व्याजाच्या आमिषाने तीन कोटींचा गंडा
गडहिंग्लज, ता. ४ : कमी कालावधीत जादा परतावा देण्याच्या आमिषाने दोन कोटी ९५ लाख २५ हजार ४४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘श्रीमंता बझार’ या कंपनीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेले २४ जण गडहिंग्लजसह लगतच्या कर्नाटक सीमाभागातील हुक्केरी तालुक्यातील आहेत. या प्रकरणी श्रीमंता बझारच्या प्रमुखासह अकरा जणांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
त्यात रणजित रावण (रा. मुरगूड), अमोल चौगुले (रा. मुरगूड चिमगाव, दोन्ही ता. कागल), वैशाली गुरव (रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज), श्रीकांत आचार्य (श्रीमंता बझारचा सर्वेसर्वा, रा. पुणे), सदाशिव चव्हाण (रा. पिंपळगाव, ता. भुदरगड), संतोष भोसले (रा. औरनाळ, ता. गडहिंग्लज), तुषार चोथे (रा. साधना हायस्कूल समोर, गडहिंग्लज), दिनेश भटनागर (अकाऊंटंट, श्रीमंता बझार रा. पुणे) धर्मेंद्र सिंगर (रा. बुदनी, जि- सिहोर, मध्यप्रदेश), विठ्ठल जाधव (रा. भीमनगर, गडहिंग्लज), रमेश शिरगावे (रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज) आदींचा समावेश आहे.