‘मॉडर्न’च्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मॉडर्न’च्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा
‘मॉडर्न’च्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा

‘मॉडर्न’च्या माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा

sakal_logo
By

शिवाजीनगर, ता. २५ : मॉडर्न हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. २६) माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित केला आहे. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, क्रीडा व शिक्षणासाठी मदत करण्याचे काम माजी विद्यार्थी मंडळाकडून करण्यात येते.

हा महामेळावा सायंकाळी ठीक साडेपाच वाजता, शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. यामध्ये माजी विद्यार्थी अॕड. श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते डॉ. गजानन एकबोटे, दोन माजी शिक्षक, शिक्षिका यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर इतर शिक्षक, शिपाई, स्वच्छता कर्मचारी व काही विशेष सत्कारदेखील या वेळी करण्यात येतील. तसेच शाळेतील पाच विद्यार्थ्यांना दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शाळेत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या महा मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.