आमदारांवरील हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदारांवरील हल्ल्याप्रकरणी दोषींवर 
कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे
आमदारांवरील हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे

आमदारांवरील हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा ः डॉ. गोऱ्हे

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : औरंगाबाद जिल्ह्यात ७ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांच्या सभास्थानी झालेली दगडफेक आणि आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर ८ फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला, या दोन्ही घटनांची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये यांना निवेदन दिले असल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

दोन्ही घटनांमध्ये आरोपींना जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांनी योग्य त्या कलमंचा वापर करावा. हे दोन्हीही हल्ले पूर्वनियोजित असल्याचे दिसत असल्याने यामागील खरे सूत्रधार कोण आहेत? याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्याबाबत ज्यांनी कोणी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. याशिवाय आदित्य ठाकरे आणि प्रज्ञा सातव यांना पोलिसांकडून पुरेशी सुरक्षा देण्याबाबत आपल्या स्तरावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी लिमये यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केली.

राज्यात घडलेल्या या दोन्हीही घटना अतिशय गंभीर आहेत. या दोन्ही घटनांचा आपल्या स्तरावर सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींना अशा प्रकारे हल्ल्यांना सामोरे जावे लागणे हे नक्कीच योग्य नाही. या पार्श्वभूमीवर निर्देश दिले आहेत.
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद