Tue, March 28, 2023

महिलांसाठी रोजगार विनिमय केंद्राचे उद्घाटन
महिलांसाठी रोजगार विनिमय केंद्राचे उद्घाटन
Published on : 9 March 2023, 11:12 am
पुणे, ता ९ : जागतिक महिला दिनानिमित्त मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी रोजगार विनिमय केंद्राचे उद्घाटन भवानी पेठ येथे संघटनेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून शिक्षित, अशिक्षित महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध क्षेत्रात रोजगार मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम महिला आघाडीच्या वतीने रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या वेळी कार्यक्रमासाठी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाशी बागवे, सुशिला नेटके, यासिर बागवे, विठ्ठल थोरात, अरुण गायकवाड, अॕड. राजश्री अडसूळ, सुरेखा खंडाळे, सुनील बावकर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.