‘पुणे आयडॉल’ची अंतिम फेरी उत्साहात

‘पुणे आयडॉल’ची अंतिम फेरी उत्साहात

शिवाजीनगर, ता. ३ : सोमेश्वर फाउंडेशनतर्फे आयोजित २२ व्या ‘पुणे आयडॉल’ स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी (ता. २) बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडली. चार विभागांत झालेल्या या स्पर्धेत लिटल चॅम्प’ गटात रिद्धी गायकवाड प्रथम, देवांश भाटे याने द्वितीय क्रमांक पटकावला. ‘ओल्ड इज गोल्ड’ गटात संजय लागो प्रथम, तर डॉ. सायली भांबुर्डे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. ‘युवा आयडॉल’ गटात प्रथम क्रमांक सौरभ शर्मा, तर द्वितीय क्रमांक गोविंद कांबळे यांनी पटकावला, तर ‘जनरल कॅटेगरी’मध्ये प्रथम सुभरा दास, तर अजय खटावकर हे द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले. या वर्षी ४५७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील साठ स्पर्धकांनी अंतिम फेरीत गायन केले. जितेंद्र भुरूक, राजेश दातार, मंजुश्री ओक, मेधा चांदवडकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे दीपक मानकर, माधव जगताप, सुनील यादव, इब्राहिम शेख, शैलेश काळे, रविराज रांका यांना ‘व्हॉइस ऑफ द चॉईस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रस्तावना व स्वागत कार्यक्रमाचे संयोजक सनी निम्हण यांनी केले. या कार्यक्रमास संदीप सिंग गिल, मुरलीधर मोहोळ, बाबू वाळुंज, डॉ. किशोर पंडित, अशोक मानकर, शैलजा खेडेकर, दामू कुंबरे, मुकारी अलगुडे, बिपिन मोदी उपस्थित होते. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उमेश वाघ, अमित मुरकुटे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com