प्रसिद्ध तबलावादक पं. भोयर यांचे निधन

प्रसिद्ध तबलावादक पं. भोयर यांचे निधन

नऱ्हे, ता. ११ : फारुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध तबला व पखवाजवादक कीर्तनकार पं. रामदास भोयर गुरुजी (वय ६१) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी गोदावरी माई, दोन मुलगे व यांच्यासह तबलावादक पांडुरंग पवार, भरत शिंदे, श्‍याम गोराणे, अशोक मोरे आदी शिष्य परिवार आहे. संगीत क्षेत्रात उत्तम तबला शिक्षक व साथसंगतकार म्हणून आदराने त्यांचे नाव घेतले जाते.
सवाई गंधर्व संगीत महोत्सव, विरासत संगीत महोत्सव, स्वानंद संगीत महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली होती. ज्येष्ठ गायक यादवराव फड, जयमाला शिलेदार, आशा खाडिलकर, खंडाळकर गुरुजी आदी दिग्गज गायकांबरोबर त्यांनी तबला साथसंगत केली होती. त्यांचे तबल्याचे शिक्षण जयवंतराव मिरजकर व पखवाजाचे शिक्षण वसंतराव घोरपडकर यांच्याकडे झाले होते. त्यांच्या निधनाने शिष्य परिवारावर शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com