चावंडगडावरील पुष्करणी गाळमुक्त करण्याचा संकल्प

चावंडगडावरील पुष्करणी 
गाळमुक्त करण्याचा संकल्प
Published on

जुन्नर, ता. २१ : ऐतिहासिक चावंडगडावरील सुंदर व देखणी पुष्करणी गाळमुक्त करण्याचे काम सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन संस्थांनी हाती घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती थोरले शाहु महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत चावंड गडावर संवर्धन कार्य करून जयंती साजरी केली. हा वारसा संवर्धित करण्यास तरुणांनी योगदान द्यावे, असे आवाहन मरहट्टे सह्याद्रीचे अमोल ढोबळे यांनी केले.

जानेवारीपासून पुष्करणी संवर्धनाचे काम सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी पुष्करणी संवर्धनाचे काम पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे. पुष्करणी गाळमुक्त झाल्याने त्यात पावसाळ्यात पाणीसाठा होऊन पुढील काळात या पाण्याचा उपयोग गडावर येणाऱ्या शिवभक्तांना तसेच गडावरील वन्यजीवांना होण्यास मदत होणार आहे. या कामासाठी स्थानिक, जिल्ह्यातील दुर्गप्रेमीकडून सहकार्य होत असल्याने पुष्करणी बऱ्याच प्रमाणात गाळमुक्त करण्यात यश आले आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पुष्करणीत माती वाहून आल्याने काम वाढले असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज व शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करून कामाला सुरुवात केली. पुष्करणीत साचलेले पाणी व गाळ काढला. यासाठी जुन्नर दुर्ग दुर्गोत्सव टीम आणि मरहट्टे सह्यादीच्या पंधरा दुर्ग संवर्धकांचे हात राबले.

यावेळी मरहट्टे सह्याद्रीचे सचिन गीते, कुंदन गाढवे, सतीश देसाई, नितीन माळी, अश्विन साळुंखे, अनिरुद्ध हांडे, ओंकार ढाके, दशरथ साबळे, कमलाकर साबळे, दिगंबर साबळे, संपत भालचीम, अविनाश शेळकंदे, विश्वास साबळे, शुभम कडू आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com