पापळवाडी-चास रस्ता कामाला प्रशासकीय अनास्थेमुळे ''ब्रेक''

पापळवाडी-चास रस्ता कामाला 
प्रशासकीय अनास्थेमुळे ''ब्रेक''
Published on

कडूस, ता. ८ : पापळवाडी-चास (ता. खेड) या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी ४० लाखांचा निधी मंजूर होऊनही प्रशासकीय अनास्थेमुळे हे काम रखडले आहे. रस्त्याच्या बाजूचे गटार काढण्यास काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असून, या प्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांकडेच तक्रारीसाठी नावे मागितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
चास ते पापळवाडी रस्त्याची गेल्या २५ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी मिळाला. मात्र, रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण हटवून गटार काढल्याशिवाय रस्ता टिकणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पोलिस बंदोबस्ताचे पत्र दिले होते. मात्र, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. ७) झालेल्या बैठकीत पोलिसांनी अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांची नावे ग्रामस्थांनी लिहून द्यावीत, असा सल्ला दिला.
ग्रामस्थांनी हा सल्ला फेटाळून लावला असून, नावे दिल्यास गावात कायमस्वरूपी वाद निर्माण होतील, अशी भीती व्यक्त केली आहे. शासकीय यंत्रणेने आपल्या अधिकाराचा वापर करून पोलिस बंदोबस्तात काम पूर्ण करावे, अशी मागणी सरपंच राजू शिंदे, माजी सरपंच नंदू शिंदे व ग्रामस्थांनी केली आहे. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकून ग्रामस्थांना वादात ढकलू नये, असा सूर पापळवाडीकरांमध्ये उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com