काशीळ अजिंक्यतारा''चे कामकाज इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक
‘अजिंक्यतारा’चे कामकाज इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक : पंकजकुमार बन्सल
काशीळ, ता. २८ : सहकार क्षेत्रातील साखर कारखाने हे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा आहेत. सहकारी साखर कारखाने सक्षमपणे चालल्यास त्या- त्या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले जाते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजिंक्यतारा साखर कारखाना आहे. राज्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांसाठी अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कार्पोरेशन, नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक पंकजकुमार बन्सल यांनी काढले.
आयएएस अधिकारी बन्सल यांनी नुकतीच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली. कारखान्याच्या कामकाजाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. या वेळी बन्सल यांच्या पत्नी जी. लाथा (आयएएस) उपस्थित होत्या.
अजिंक्यतारा कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला उच्चतम दर देत आहे, तसेच गाळप झालेल्या उसाचे पेमेंट वेळेत अदा करत आहे, याबद्दल बन्सल यांनी समाधान व्यक्त केले. कारखान्याने शेतकऱ्यांचे प्रतिएकरी उत्पादन वाढवण्यासाठी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करावा, त्याचप्रमाणे साखर उत्पादन बरोबरच उपपदार्थ प्रकल्पांच्या क्षमता वाढवाव्या आणि सीबीजी प्रकल्प हाती घ्यावेत, केमिकल्स उत्पादन करावे, अशा सूचना बन्सल यांनी या वेळी केल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, एनसीडीसी पुण्याचे रिजनल डायरेक्टर गिरिराज अग्निहोत्री, डायरेक्टर पुनीत गुप्ता आणि गणेश गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड, सातारा जिल्हा निबंधक संजय सुद्रिक, कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, संचालक सर्जेराव सावंत, रामचंद्र जगदाळे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आणि अधिकारी उपस्थित होते.
01603
शेंद्रे : पंकज कुमार बन्सल यांच्या सत्कार करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्या वेळी जिवाजी मोहिते, संतोष पाटील, यशवंत साळुंखे, नामदेव सावंत आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

