शिरवळ - दोन्ही कारचा  अपघात - १ ठार ७ जखमी .

शिरवळ - दोन्ही कारचा अपघात - १ ठार ७ जखमी .

Published on

तोंडलनजीक दोन मोटारींची धडक

एक ठार, सात जण जखमी; वळणमार्ग लक्षात न आल्‍याने अपघात

शिरवळ, ता. १५ : शिरवळ- लोणंद रस्त्यावरील वीर धरणालगत असणाऱ्या तोंडल (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत आज दोन मोटार कारची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. समीर हमीद शिकलगार (वय ४५, रा. शिरवळ) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्‍यान, रस्ताच्या चौपदरीकरण कामामुळे वळण मार्ग लक्षात न आल्‍याने हा अपघात झाल्‍याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेत लक्ष्मण भरत माने (वय ३१, रा. शिंदेवाडी), विक्रमा आनंदा भंडलकर (वय ३० रा. भादवडे), बाळकृष्ण रामचंद्र कोंढाळकर (वय ६२, रा. तोंडल), विष्णू लक्ष्मण शिखले (वय ३९, रा. तरडगाव, ता. फलटण), हिराबाई बापू मरळ (वय ६१, रा. शिरवळ), छाया विजय देवडे (वय ४५, रा. शिरवळ), ताराबाई विठ्ठल देवडे (वय ६५, रा. शिरवळ) अशी जखमी झालेल्‍यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की शिरवळ- लोणंद रस्त्याचे चौपदरीकरण सध्‍या सुरू आहे. त्‍यामुळे तोंडल गावच्या हद्दीत हा मार्ग वळविण्यात आला आहे. मात्र, एक मोटार कार (एमएच १२ एसक्यू ८३०९) लोणंदहून शिरवळकडे जात असताना, पुढील बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या मोटार कारने (एमएच १३ ईसी १९९७) पुढे निघालेल्‍या कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यातील सर्व प्रवासी मोटारीतून बाहेर फेकले गेले, तर चालक शकील शिकलगार हे जागीच ठार झाले. पहिली कार दुभाजकाला जोरदारपणे धडकली. यामध्‍ये दोन्‍ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारच्‍या चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. हा चालक सोलापूर येथील असल्याचे समजते. यावेळी शिरवळ पोलिस व रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जखमींना तत्काळ शिरवळ येथील रुग्‍णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

----------------------------------------------------
वळण रस्‍ता बेतला जिवावर
शिरवळ- लोणंद रस्त्यावर चाललेल्या कामामुळे वळण रस्ता हा फलक लावला होता. मात्र, शिरवळ बाजूकडून येणाऱ्या कार चालकाला ते कळालेच नाही. याच वेळी लोणंदकडून येणारी एक कार मात्र पुढे जात असताना, अचानक भरधाव वेगात शिरवळकडून येणाऱ्या दुसऱ्या कारने पुढील कारला मोठी जोराची धडक दिली. त्‍यामुळे ती दुभाजकाला धडकली आणि त्‍यातील प्रवासी रस्त्यावर पडले.
----------------------------------------------------------------------
फोटो :..........KHN25B05822

तोंडल (ता. खंडाळा) : अपघातात नुकसान झालेल्‍या मोटार कार.

KHN25B05823
मृत समीर शिकलगार.
----------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com