खंडाळा - ३ जानेवारी ला सावगीबाई फुले स्मारकाचे भुमिपुजन - जयकुमार गोरे
क्रांतिज्योतींच्या स्मारकाचे शनिवारी भूमिपूजन
जयकुमार गोरे; नायगावात जयंती उत्सवाच्या तयारीची पाहणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम
खंडाळा, ता. २७ : स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी नायगाव येथे भव्य दिव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा राज्याच्या जनतेची अनेक दिवसांपासून होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर केवळ एकाच वर्षात या स्मारकाचे भूमिपूजन तीन जानेवारीला नायगाव येथे होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
नायगाव (ता. खंडाळा) येथे १९५ व्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमस्थळी पाहणीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, सरपंच स्वाती जमदाडे, उपसरपंच गणेश नेवसे, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षण अधिकारी गजानन आडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनुप सूर्यवंशी, निखिल झगडे, आदेश जमदाडे, अविनाश वाडकर, ऋषिकेश धायगुडे- पाटील, अतुल पवार, हर्षवर्धन शेळके- पाटील, बाळासाहेब जाधव, वैभव कांबळे, सागर नेवसे, सोनाली नेवसे, हनुमंत नेवसे, रेश्मा कानडे, साधना नेवसे, सागर नेवसे, पूनम नेवसे, जगन्नाथ नेवसे, सिदुनाना नेवसे, अविनाश वाडकर, प्रकल्प संचालक विश्वास सिद, कार्यकारी अभियंता एम. वाय. मोदी व श्री. नलावडे, उपअभियंता माधव पाटील, ग्रामसेवक यशोदा बनकर, तलाठी स्मिता शिर्के, मुख्याध्यापिका स्वाती पालकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंत्री गोरे यांनी दिली. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, तसेच नायगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांना आवश्यक सूचना दिल्या.
जयंती उत्सव व स्मारक भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने सर्व समाज बांधव नायगाव येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सावित्रीमाईंची जन्मभूमी नायगाव येथे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
---------------------------
05859
नायगाव : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नव्याने स्मारक उभारणीच्या ठिकाणी यावर्षी होणाऱ्या कार्यक्रमस्थळाची माहिती घेताना जयकुमार गोरे. त्या वेळी एम. वाय. मोदी, तुषार दोशी व अधिकारी व ग्रामस्थ.
----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

