आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत तेजसची झेप

आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत तेजसची झेप
Published on

लोणी काळभोर, ता. १२ : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ लोणी-काळभोर येथील स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगचा विद्यार्थी तेजस मनोज पाटील याची चीनमधील शांघाई येथे १५ ते १७ मे २०२६ दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
ही निवड भारतीय तलवारबाजी संघटनेतर्फे अधिकृतपणे जाहीर केली असून, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगभरातील अव्वल फेन्सर्स सहभागी होणार आहेत. फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवड अधिसूचनेनुसार, तेजस मनोज पाटील याची भारतीय पुरुष ‘फॉइल’ संघात निवड केली आहे.
तेजस पाटीलने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, मेहनत आणि खेळातील उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळविले आहे.
या कामगिरीनंतर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस, प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, प्र. कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी आदींनी तेजसचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com