पुणे
लोणंद - युवतीच्या विनयभंगा प्रकरणी एकास अटक.
विनयभंगप्रकरणी
एकास अटक
लोणंद, ता. १५ : तालुक्यातील एका गावातील युवतीच्या विनयभंगप्रकरणी लोणंद पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. तुषार ऊर्फ बाबू अरुण शिंदे असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुषार ऊर्फ बाबू शिंदे याने एका युवतीस दुसऱ्याच्या मोबाईलवरून सातत्याने फोन करून व तिचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची फिर्याद पिढीत युवतीने दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक श्री. हेगडे तपास करत आहेत.
-----------------------------

