भारतीय शेअर बाजार निर्देशांक 
सर्वकालिक उच्चांकाच्या दिशेने

भारतीय शेअर बाजार निर्देशांक सर्वकालिक उच्चांकाच्या दिशेने

Published on

भारतीय शेअर बाजार निर्देशांक
सर्वकालिक उच्चांकाच्या दिशेने
मुंबई, ता. २० : बड्या शेअरमध्ये झालेली खरेदी, परदेशी गुंतवणूकदारांचे पुनरागमन आणि अमेरिकेतील एनव्हिडिया एआय कंपनीचे चांगले निकाल यामुळे आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी आपल्या वर्षभरापूर्वीच्या सर्वकालिक उच्चांकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शेअर बाजार आज नफा दाखवत सुरू झाला आणि दिवसभरात त्यांच्यातील नफा वाढत गेला. १३९.५० अंश वाढलेला निफ्टी दिवसअखेर २६,१९२.१५ अंशांवर स्थिरावला, तर ४४६.२१ अंश वाढलेला सेन्सेक्स दिवसअखेर ८५,६३२.६८ अंशावर बंद झाला.

सेन्सेक्सने ८५,८०० पर्यंत मजल मारली होती. निफ्टीने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये २६,२७७ अंशांचा सर्वकालिक उच्चांक नोंदवला होता, तर निफ्टी दुपारनंतर २६,२४६.६५ अंशांवर गेला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक आज स्थिर राहिले, तर बँका आणि वित्तसंस्था, रसायन उद्योग, ऑइल ॲन्ड गॅस, वाहननिर्मिती ही क्षेत्रे अर्धा ते एक टक्का वाढली. खासगी बँकांच्या शेअरच्या खरेदीमुळे बँक निफ्टीदेखील सार्वकालिक उच्चांकावर गेला. परदेशी वित्तसंस्थांनी बुधवारी १,५८० कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले, असे सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले.
सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज दोन टक्क्यांपेक्षा जास्त वाढले, तर एचडीएफसी बँक, टेक महिंद्र, ॲक्सिस बँक सव्वा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. ट्रेंट, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरचे भावही वाढले, तर एशियन पेंट, एच सी एल टेक हे शेअर एक टक्क्यापेक्षा जास्त घसरले. टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक या शेअरचे भावही घसरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com