प्रभाग एक मध्ये मतदार कुणाला करणार जय महाराष्ट्र आणि कुणाला करणार जय श्रीराम
PNE25V76718
अनिता नागणे
---
PNE25V76719
प्रा. येताळा भगत
---
PNE25V76720
प्रतीक्षा मेटकरी
---
PNE25V76722
अंजुम सय्यद
---
नागणे अन् भगत यांच्या
लढतीत कोण बाजी मारणार?
प्रभाग एकमध्ये मतदार कुणाला करणार जय महाराष्ट्र आणि कुणाला करणार जय श्रीराम
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १५ : नगरपालिकेच्या आखाड्यात निर्णायक ठरणाऱ्या प्रभाग एकमधील निवडणूक ही यंदा लक्षवेधक ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनिता नागणे या स्थानिक आघाडीतून पुन्हा आखाड्यात आहेत, तर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपचे ‘कमळ’ हाती घेतलेल्या प्रा. येताळा भगत यांच्यातील लढतीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले.
प्रभाग एकमधील मतदार संख्या जवळपास २३८० इतकी आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या प्रभागातील मतदारांकडे विशेष केंद्रित केले जाते. यंदाची नगरपालिकेची निवडणूक सुद्धा लक्षवेधक ठरणार आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया जगताप यांचे पती अजित जगताप यांनी या प्रभागामध्ये विकासकामे केली तर खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे व बबनराव आवताडे यांचा या परिसरात दामाजीनगर ग्रामपंचायतमुळे संपर्क वाढला आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनिता नागणे यांनी यापूर्वी पाच वर्षात या प्रभागामध्ये नगरपालिकेच्या अनेक योजना राबविल्या. मागील कामाच्या जोरावर त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणुकीत उभ्या आहेत. आंदोलक चेहरा म्हणून परिचित असलेले प्रा. येताळा भगत हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. आमदार समाधान आवताडे व अजित जगताप यांचे पाठबळ त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संतोष नागणे हे देखील आखाड्यात आहेत. अनिता नागणे व प्रा. येताळा भगत यांच्या लढतीत संतोष नागणे किती मते खाणार, यावर विजयी उमेदवाराचे गणित अवलंबून राहणार आहे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून महिला राखीव जागेवर अंजुम सय्यद यांच्या विरोधात भाजपच्या प्रतीक्षा मेटकरी यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय आशा मेटकरी या अपक्ष निवडणूक लढवत असून, प्रतीक्षा मेटकरी, आशा मेटकरी व अंजुम सय्यद या तिघींच्या लढतीत मतदार कुणाला संधी देणार, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
-----
प्रभाग एकमधील समस्या
१९९५ पूर्वीचे अतिक्रमण कायम करणे, नागणेवाडी तलाव सुशोभीकरण करून खेळाचे साहित्य बसवणे, प्रभागामध्ये दररोज पिण्याचे पाणी उच्च दाबाने पुरवणे, गटार स्वच्छता व ड्रेनेजची व्यवस्था करणे, अंतर्गत रस्ते, क्रीडांगण, संभाजीनगर व कृष्णा नगर या प्रभागाला जाण्यासाठी रस्ता करणे, याशिवाय डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जंतुनाशक फवारणीची मागणी या प्रभागातून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

