दामाजी कारखान्याचे नोव्हेंबरचे 2800 बँकेत वर्ग :- अध्यक्ष पाटील
फोटो ओळी MGV25B14987
मंगळवेढा : यंदाच्या हंगामातील ऊस दराचे तीन हजार रुपये दामाजी कारखान्याकडून २८५० रुपये पहिला हप्ता देण्याबाबतचे पत्र घेताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.
दामाजी कारखाना पहिला हप्ता २८५० देणार
स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनानंतर निघाला तोडगा
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २७ : दामाजी कारखान्याने १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रतिटन २८००/- प्रमाणे पहिला हप्ता मागणीनुसार वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली. दरम्यान, पहिला हप्ता तीन हजार रुपये प्रमाणे द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करत गव्हाण बंद आंदोलन केले. शेवटी २८५० रुपये पहिला हप्ता नंतर १५० असा तोडगा निघाला आहे.
याप्रसंगी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्रथमेश पाटील, कार्यकारी संचालक रमेश जायभाय, यांचेसह खातेप्रमुख, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद, तोडणी व वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील म्हणाले की, यंदाच्या हंगामात महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व वातावरण पोषक झाल्याने उसाची वाढ चांगल्या प्रमाणात झाली. कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसताना काटकसरीने इतर खर्चाचे नियोजन करून ऊस उत्पादकांना २८००/- प्रमाणे ऊसबिलाचा निर्णय घेतला.
उपाध्यक्ष तानाजी खरात म्हणाले की, चालु हंगामात दामाजी कारखान्याने आजअखेर एकूण ५४ दिवसांत १ लाख ५५ हजार मे.टन गाळप करून १ लाख ३९,४०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले. आजचा साखर उतारा १०.२४% असून आजअखेर साखर उतारा ९.०४% मिळाला. स्वाभिमानीच्या आंदोलन तर कारखाना व्यवस्थापनाने पहिला चा तीन हजार रुपये दर देण्याचे मान्य करून पहिला २८०० व दोन हजार रुपये नंतर देण्याच्या निर्णय घेतला होता. परंतु, स्वाभिमानीने एकरकमी तीन हजार रुपयाचा पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी आज गव्हाण बंद आंदोलन केले. शेवटी कारखाना व्यवस्थापनाने कारखान्यासमोरील आर्थिक अडचणी अन्य प्रकल्प नसल्यामुळे इतर होणारा खर्च पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामोपचाराची भूमिका घ्यावी अशी विनंती करत २८५० रुपये पहिला हप्ता नंतर १५० रू देण्याचे मान्य केल्याने स्वाभिमानींचे आंदोलन मागे घेतले
--------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

