महाबळेश्वरचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्तक्षेपाने दिवसाआडचा निर्णय रद्द

महाबळेश्वरचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्तक्षेपाने दिवसाआडचा निर्णय रद्द

Published on

महाबळेश्वरचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत

नगराध्यक्ष सुनील शिंदेंच्या हस्तक्षेपाने दिवसाआडचा निर्णय रद्द

महाबळेश्वर, ता. २७ ः नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी अद्याप अधिकृत पदभार स्वीकारलेला नसतानाही शहरातून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित खात्याचे अधिकारी, तसेच प्रशासक योगेश पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.
येथील पालिकेचा पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून थकबाकीच्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, संबंधित प्राधिकरणाकडून वारंवार पाणीपुरवठा बंद केला जात असल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे पालिकेचे दैनंदिन नियोजन विस्कळित झाले होते. ऐन पर्यटन हंगामात पाणीपुरवठा खंडित होत असल्याने पर्यटकांमध्येही चुकीचा संदेश जाऊन महाबळेश्वरच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची चिंता व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर प्रशासक योगेश पाटील यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला होता. या प्रश्नात मध्यंतरी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी लक्ष घालून मुंबईतील मंत्रालयात संबंधित प्राधिकरण व खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठकांचे नियोजन केले होते. मात्र, अपेक्षित गतीने ठोस निर्णय न झाल्याने परिस्थितीत फारसा बदल झाला नव्हता.
दरम्यान, पुन्हा एकदा पाणीपुरवठा दिवसाआड करण्याचा निर्णय जाहीर झाल्याने शहरात अस्वस्थता पसरली होती. अशा वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी अद्याप अधिकृत पदभार स्वीकारलेला नसतानाही शहरातून येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेतली. त्यांनी संबंधित खात्याचे अधिकारी, तसेच प्रशासक योगेश पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला.
या हस्तक्षेपानंतर या हंगामातील दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून, २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान नियोजित असलेला दिवसाआडचा पाणीपुरवठा २८ डिसेंबरपासून नियमित स्वरूपात सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी बैठकीनंतर व्हॉट्सॲपद्वारे जाहीर केली. यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या तत्परतेचे स्वागत होत आहे.
दरम्यान, ‘महाबळेश्वर न्यूज’ या व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिक शहरातील विविध समस्यांवर सातत्याने चर्चा करत असून, हा समूह स्थानिक प्रश्नांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com