पवार

पवार

पुरोगामी विचार प्रत्यक्षात अमलात आणतो : अजित पवार
मोशीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यात प्रतिपादन
मोशी, ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई यांचे पुरोगामी विचार आम्ही फक्त मांडत नाहीत तर ते प्रत्यक्षात अमलात आणतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता. ६) केले.
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा मोशीत आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, शाम लांडे, वसंत बोराटे, विक्रम लांडे, महिलाध्यक्षा प्रा. कविता आल्हाट आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, ‘‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी आम्ही राजकारण करीत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला कामाची संधी मिळाली आणि त्याच्यातून अनेकांना आमदार केले. वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या जातींना आपण बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. आज महाराष्ट्रात काही वाचाळवीर थांबायला तयार नाहीत. समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य होत आहेत. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून पुरस्कार मिळाला होता. तसे सुंदर शहर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’’
चाकण, तळेगाव, रांजणगाव एमआयडीसीतील आणि नाशिक रस्त्यावरील वाहतूक समस्या कमी करण्याच्या करता मी निती गडकरी यांच्याशी अनेकदा चर्चा केली. नाशिक फाटा ते राजगुरुनगर, तळेगाव चाकण, शिक्रापूर, पुणे अहमदनगर रस्त्यावरची वाघोली ते शिरूर या तिन्ही मार्गांवरील वाहतूक कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इंद्रायणी नदी प्रदूषण कमी करण्याच्या बाबतीतही प्रयत्न सुरु आहेत. शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यासाठी भामा आसखेड मंजूर करून घेतले, असेही पवार यांनी नमूद केले.
वसंत बोराटे यांनी स्वागत केले. अतिश बारणे यांनी आभार मानले. दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.
-----

फोटो ओळी
photo id 94342,
94343

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com