म्हसवड नगरीच्या विकास कामास जो जो शब्द दिला ता पुर्ण करे - ,जयकुमार गोरे

म्हसवड नगरीच्या विकास कामास जो जो शब्द दिला ता पुर्ण करे - ,जयकुमार गोरे

Published on

म्हसवडच्या नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

मंत्री गोरेंच्या हस्ते सत्कार; मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करणार

म्हसवड, ता. २६ : येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा वीरकर यांनी आज पालिकेत पदभार स्वीकारला. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, बिहार राज्याचे शिक्षण संचालक विक्रम वीरकर, भाजपचे शिवाजी शिंदे, शंकर वीरकर, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, पालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, माजी नगरसेवक अप्पा वीरकर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, नगरसेविका चैताली शिंदे, सविता मासाळ, माधुरी कलढोणे, श्रीदेवी पिसे, स्नेहल सूर्यवंशी, प्रमिला ढाले, अरुणा गायकवाड, पूनम वीरकर, स्वाती बनगर, दीपाली शिंदे, युवराज सूर्यवंशी, विजय धट, आकील काझी, प्रज्योत कलढोणे, लखन लोखंडे, आकाश पानसांडे, महावीर वीरकर, विजय बनगर, अभिषेक वीरकर उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, ‘‘सिद्धनाथाच्या आशीर्वादाने भाजपचे सर्व २१ उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झालेत. म्हसवड नगरीच्या विकासकामांबाबत जो शब्द दिला आहे, तो पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. पालिकेत आपण पैसे मिळविण्यास नव्हे, जनतेची कामे करण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे. निवडून आलो म्हणजे झालं असे होत नाही. निवडून आलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आजपासून कामाला लागावे.’’

यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या वतीनेही मंत्री गोरे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक काम करण्याची हमी देत, शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि विकासासाठी वचनबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

02346
म्हसवड ः नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा वीरकर यांच्या पदग्रहण समारंभप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे, नवनिर्वाचित सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com