शाश्वत शेती काळाची गरज : सराफ

शाश्वत शेती काळाची गरज : सराफ

Published on

नसरापूर, ता.२७ : पर्यावरणास अनुकूल व नैसर्गिक संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शाश्वत शेती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन रोटरीचे पर्यावरण संचालक राजेंद्रकुमार सराफ यांनी केले.
वरवे (ता.भोर) शाश्वत कृषी प्रशिक्षण कार्यशाळेत गुरुवारी (ता. २५) शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती भोर कृषी विभाग, रोटरी इंटरनॅशनल प्रांत ३१३१ व ग्रामपंचायत वरवे बुद्रुक यांच्या वतीने शाश्वत शेती प्रशिक्षण कार्यशाळा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शेतीतील मातीने भरलेल्या कलशाचे महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू रवींद्र बनसोड, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, कृषी अधिकारी युवराज कारंडे, कृषी विस्तार अधिकारी विजय कोळी, भोरचे माजी उपसभापती अमोल पांगारे, डॉ.संतोष गोसावी, डॉ.मीना बोराटे, संतोष मराठे, अविनाश डोईफोडे, गोविंद जगदाळे, राणी संतोष शेटे, नागेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान,कार्यक्रमात वरवे परिसरातील १८ शेतकऱ्यांचा आदर्श शेतकरी म्हणून रोटरीच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेबरोबर आयोजित कृषी प्रदर्शनात सेंद्रिय शेती उत्पादने, सेंद्रिय खते विविध यांत्रिक शेती अवजारे, आदी कृषी विषयक स्टॉल लावण्यात आले होते. त्यास वरवे परिसरातील सुमारे ३०० शेतकऱ्यांनी भेट दिली.
श्वेता उंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर ग्रामपंचायत अधिकारी अभय निकम यांनी आभार मानले.
06075

Marathi News Esakal
www.esakal.com