
दुबई, ता. १७ : नाट्यमय घडामोडीने गाजलेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करून दुसऱ्या विजयासह सुपर फोर फेरीत प्रवेश केला. यामुळे येत्या रविवारी (ता. २१) पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळला जाणार आहे.
फखर झमानचे अर्धशतक आणि प्रमुख गोलंदाज असलेल्या शाहीन आफ्रिदीच्या नाबाद २९ धावांच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम ९ बाद १४६ धावा उभारल्या. यूएईने सुरूरुवातीला पाकच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. मात्र, शाहीनने फटकेबाजी केल्याने पाकला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. यूएईची सुरुवात आश्वासक होती. मात्र, अलिशान शराफू आणि कर्णधार महम्मद वसीम हे दोन भरवशाचे फलंदाज लवकर बाद झाल्याने त्यांचा धावांचा वेग मंदावला. इतर फलंदाजांना वेग वाढविता आला नाही व अखेर यूएईला १०५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान २० षटकांत ९ बाद १४६ (फखर झमान ५०, सलमान आघा २०, महम्मद हॅरिस १८, शाहीन आफ्रिदी नाबाद २९, १४ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, जुनैद सिद्दिकी ४-१८, सिमरनजित सिंग ३-२६) यूएई १७.४ षटकांत १०५ (अलिशान शराफू १२, महम्मद वसीम १४, ध्रुव पाराशर २०, राहुल चोप्रा ३५, अब्रार अहमद २-१३, सईम अयुब १-१८, शाहीन आफ्रिदी २-१६, हॅरिस रउफ २-१९)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.