नागठाणे क्रीडा पानासाठी
टेनिक्वाइट खेळाचे पांगारे शाळेला विजेतेपद
जिल्ह्यात प्रथम; प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्यांनी खेचून आणली विजयश्री
शेंद्रे, ता. १५ : यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत यंदा प्रथमच समावेशीत करण्यात आलेल्या टेनिक्वाइट या खेळाचे विजेतेपद दुर्गम भागात असलेल्या पांगारे (ता. सातारा) येथील शाळेने पटकाविले. या संघातील खेळाडूंचे विशेष कौतुक होत आहे.
म्हसवड येथील मेगा सिटीमध्ये (कै.) यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय बाल क्रीडा पार पडल्या. त्यात यंदा नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या टेनिक्वाइट या खेळाचे विजेतेपद पांगारे येथील शाळेने पटकाविले. उल्लेखनीय म्हणजे केवळ तीन खेळाडूंच्या बळावर या संघाने ही विजयश्री खेचून आणली. मुळातच रिंग टेनिसच्या या खेळात पाच खेळाडू असतात. मात्र पांगारे ही डोंगराळ भागातील शाळा असल्यामुळे येथील पटसंख्याही अगदीच जेमतेम. त्यातून केवळ तीन खेळाडूंचा संघ तयार झाला. त्यातील तन्मय जाधव, शंतनू जाधव, आदित्य पवार या खेळाडूंनी जिद्द अन् कौशल्याचे दर्शन घडवीत उपस्थित प्रेक्षकांची मनेही जिंकली. यावेळी पांगारेच्या संघाने चार तालुक्यांच्या संघांवर मात केली. या खेळाडूंना गणेश शिंदे, एस. आर. गावित, अंगद बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी संघातील खेळाडूंचे विशेष कौतुक केले. सरपंच दिलीप चव्हाण, उपसरपंच गोपीनाथ पवार, विस्तार अधिकारी मालोजी घोरपडे, केंद्रप्रमुख दादाजी बागूल, जिल्हा क्रीडा समन्वयक विकास भुजबळ, युवराज कणसे, तसेच ग्रामस्थांनीही यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
............................................
डोंगर भागातील ही मुले मुळातच काटक अन् तितकीच चपळ होती. त्यातच गेली तीन महिने त्यांनी अगदी कसून सराव केला. त्यामुळेच यंदा पहिल्याच वर्षी शाळेला हे नेत्रदीपक यश लाभले.
- गणेश शिंदे,
मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा, पांगारे
..............................................
छायाचित्र :.............07948
म्हसवड : टेनिक्वाइट खेळाचे विजेतेपद स्वीकारताना पांगारे शाळेचे खेळाडू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

