शक्ती पीठ महामार्गाला विरोध म्हणून उद्या शेतकरी मेळावा आयोजित केला आहे

शक्ती पीठ महामार्गाला विरोध म्हणून उद्या शेतकरी मेळावा आयोजित केला आहे
Published on

निमगाव येथे आज शक्तिपीठ महामार्गविरोधी मेळावा

नातेपुते, ता. १० : शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन सोमवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजता निमगाव (ता. माळशिरस) येथे करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.
या मेळाव्यात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार रोहित पवार, आमदार उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर आणि माजी सभापती मच्छिंद्र ठवरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

चौकट
माळशिरस तालुक्यात महामार्गाला विरोध वाढला
शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात नव्याने माळशिरस तालुक्याचा समावेश झाल्याने येथील अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. बागायती जमीन संपादीत होण्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी महामार्गाला विरोध सुरू केला आहे. दुसरीकडे, काही स्वयंघोषित कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सरकारी मूल्याच्या दहापट नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात आहे. तसेच फळझाडांची लागवड केल्यास त्यासाठीही मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळेल, असा दावा केला जात असल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com