एसआयटीकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

एसआयटीकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
Published on

एसआयटीकडून दोषारोपपत्र दाखल
भोंदू खरात प्रकरण : १३ हजार आक्षेपार्ह लिंक्स हटवल्या
​सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : संशयित भोंदू अशोक खरात याच्याविरोधात दाखल लैंगिक शोषणाच्या दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) उर्वरित सात गुन्ह्यातील दोषारोपपत्र येत्या काही दिवसात न्यायालयात दाखल करणार आहे. दरम्यान, तपासादरम्यान एसआयटीने १०५ साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घेतले असून, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेले सुमारे १३ हजार व्हिडिओ लिंक्स हटविल्या.
दैवी शक्तीचा बनाव रचून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि शारीरिक व आर्थिक फसवणूक करणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात नाशिक शहर व ग्रामीणसह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आतापर्यंत दोन गुन्ह्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून, उर्वरित गुन्ह्यांच्या दोषारोपपत्रांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खरातने श्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांच्या सहायतेच्या व त्यांना मृत्यूची भीती दाखवून त्यांचे लैंगिंक शोषण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
​२४ जणांचे एसआयटी पथक
पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार २० मार्च २०२६ पासून या प्रकरणाचा तपास एसआयटी करीत आहे. महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीच्या पथकात २ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक आणि ६ पोलीस अंमलदार असा एकूण २४ जणांचा समावेश आहे.
​१०५ साक्षीदारांची चौकशी
एसआयटीने खरातविरोधातील गुन्हयांमध्ये आतापर्यंत १०५ हून अधिक साक्षीदारांची चौकशी करीत त्यांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. याप्रकरणी संशयित खरातविरोधात भौतिक, दस्तऐवजी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे एसआयटीच्या पथकाने संकलित केले आहेत.
१३ हजार व्हिडिओ लिंक्स
पीडित महिलांचे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह व्हिडीओ एसआयटीच्या पथकाने हटविले आहेत. . महाराष्ट्र सायबर सेलच्या मदतीने तब्बल १३ हजार १७५ लिंक्स काढून टाकण्यात आल्या आहेत. वारंवार आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणारी ४५१ सोशल मीडिया खातीही कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com