फोटो : A14170
नाशिक : ट्रॅक्टर हाऊस परिसरात ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग
--
शॉर्टसर्किटमुळे ट्रान्सफॉर्मर पेटला
अग्निशमन जवानांमुळे मोठी दुर्घटना टळली
सकाळ वृत्तसेवा
जुने नाशिक, ता. १६ : ट्रॅक्टर हाऊस परिसरातील ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले व पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली.
अग्निशमन मुख्यालयात ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पथकप्रमुख किशोर पाटील, लीडिंग फायरमन इसाक शेख, फायरमन महेश कदम, स्वप्निल नांदे, साकेत भवर, अभिषेक बैरागी यांचे अग्निशमन पथक अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. ट्रान्सफॉर्मरला चारही बाजूंनी आग लागल्याचे निदर्शनास आले. प्रथम वीजपुरवठा खंडित करून न पाण्याचा मारा आणि कुलिंग करत आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसरात माहिती मिळताच बघ्यांची गर्दी झाली होती. आगीने रुौद्ररूप धारण केले असल्याने ऑइल मोठ्या प्रमाणावर उकळत होते. दूरपर्यंत ऑइल उकळण्याचा आवाज येत होता. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होतो की काय अशी भीती निर्माण होती. त्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांनादेखील अतिशय सावधानपूर्वक पाण्याचा मारा करावा लागला.