एकाही समस्येची सोडवणूक झाली नाही
पुणे महापालिका हद्दीमध्ये बावधन बुद्रूक गावाचा समावेश झाला, त्यामुळे करामध्ये काही पटींनी वाढ झाली, पण मूलभूत सुविधांचा मात्र अभावच आहे. वास्तविक पाहता कोणत्याही गावाला पालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी तिथे मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे असते. चांगले रस्ते, मुबलक पिण्याचे पाणी, उत्तम सांडपाणी प्रक्रिया तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प, प्रदूषणमुक्त व स्वच्छ हवा, २४ तास वीज, लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त उद्याने, क्रीडांगणे पाहिजेत. परंतु पुणे महापालिकेने येथील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे.
- रेखा राकेश धोत्रे, साई प्लॅटिनम, बावधन बुद्रूक
महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर आम्हाला शहर पातळीवरील सुविधा मिळतील असे वाटले. त्यानुसार महापालिका आमच्याकडून मुबलक कर घेत आहे, पण नागरी सुविधांची वानवा आहे. येथील कचरा उचलला जात नाही. आम्ही खासगी व्यक्तीला ते काम दिले आहे. पाणी पुरत नाही. आमचा महिन्याचा पाणी खर्च पाच लाख रुपये आहे. वीज, रस्ता, आरोग्य, मनोरंजन, पदपथ, क्रीडांगण अशा सुविधा नाहीत. आमच्या एकाही समस्येची सोडवणूक झाली नाही.
- सचिन सांबे, स्टारगेझ सोसायटी, बावधन

