निविदेतील घोळाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निविदेतील घोळाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
निविदेतील घोळाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

निविदेतील घोळाविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. २० : महापालिकेने काढलेल्या रस्त्यांच्या कामाच्या निविदेत राजकीय दबाव आणल्याने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करून निषेध केला. तसेच या निविदेतील नियमात बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. गेली ५ वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आता प्रशासकराज असतानाही तेच प्रकार घडत आहेत. या निविदेतील अटी -शर्ती दुरुस्त करून पुन्हा निविदा काढावी व संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. आमदार चेतन तुपे, राजलक्ष्मी भोसले, योगेश ससाणे, फारुक इनामदार, सुनिल बनकर, गफूर पठान, प्रदीप गायकवाड, महेंद्र पठारे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.